Home > Marathi News (page 9)

Marathi News

’मेकअप’मध्ये रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी गणेश पंडित यांचे दिग्दर्शनात पाऊल

Rinku Rajguru & Chinmay Udgirkar

  आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनयकौशल्याने गणेश पंडित यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा नावलौकिक कमावल्यानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत ‘मेकअप’ या …

Read More »

मोहन जोशींचा ‘रफ अँड टफ’ लू

MOHAN JOSHI

आपल्या दमदार अभिनयाने अवघी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते मोहन जोशी ‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून यात त्यांचे काही ॲक्शन सीन्सही आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात बुलेटही चालवली आहे. मुळात त्यांच्या भारदस्त आणि करारी व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यासाठी ही भूमिका …

Read More »

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमातून एकत्र झळकणार…

sonali and spruha joshi

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमातून एकत्र झळकणार… सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी यांच्याबरोबर संग्राम समेळ, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी यांच्यादेखील मुख्य भूमिका, अर्जुन सिंग बरान आणि …

Read More »

‘जवानी झिंदाबाद’चा युथफुल ट्रेलर प्रदर्शित

JAWANI ZINDABAD Marathi Trailer

सळसळता उत्साह म्हणजे तरुणाई. ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचा युथफुल ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे, केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. या …

Read More »

आनंदी हे जग सारे – सोनी मराठीवर २ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता

नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या सोनी मराठीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या प्रत्येक विषयाचे स्वत:चे असे आकर्षण असते. अशाच एका वेगळ्या विषयाची नवी गोष्ट सोनी मराठी घेऊन येत आहे. स्वमग्नता किंवा ऑटिझम या विषयावर फारसे बोलले जात नाही, पण एका मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीवर अशीच एक …

Read More »

मराठी चित्रपटसृष्टीची मोठ्या प्रमाणात प्रगती होण्याची क्षमता

Naren Kumar

मुलींच्या जीवनावर आधारित ‘गर्ल्स’ हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून याची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. नरेन कुमार यांची निर्मिती असलेला हा दुसरा मराठी सिनेमा आहे. ‘चुंबक’ सारख्या सुजाण आणि संवेदनशील कलाकृतीची निर्मिती केल्यानंतर नरेन कुमार …

Read More »

तरुणाईला ठेका धरायला लावणारे ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे प्रदर्शित

Vicky Velingkar - Da Ra Ding Ding Na

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत तसेच सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या ट्रेलरने समाजमाध्यमांवर चांगलीच हलचल निर्माण केली असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली …

Read More »

‘आटपाडी नाईट्स’ साठी सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता

Subodh Bhave

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. सुबोध आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज झाला असून तो ‘आटपाडी नाईट्स’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या …

Read More »

सोनी मराठीवरून सुबोध भावे घडवणार लोककलांनी समृध्द महाराष्ट्राचं दर्शन

सोनी मराठी एका पाठोपाठ एक कमाल कार्यक्रमांचा नजराणा प्रेक्षकांसमोर पेश करत आहे. २ डिसेंबरपासून सुरू होणारा लोककलांवर आधारित “जय जय महाराष्ट्र माझा” यापैकीच एक. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्र जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. . पारंपरिक लोककलांनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जपल्या जाणार्‍या लोककला नव्याने जिवंत करण्याचा सोनी मराठीचा एक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे लोककलांचं ज्ञान असणारा अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. ज्या लोककलांनी महाराष्ट्र घडला, एक झाला अशा शाहीरी, लावणी, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, वासुदेवसारख्या विविध लोककलांचा आविष्कार या मंचावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शकुताई नगरकर, शाहीर अमर शेखांची परंपरा चालवणारे निशांत शेखसारखे कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत. २ डिसेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार असून पुढे आदर्श शिंदे, नंदेश उमप, कार्तिकी गायकवाड, प्रसनजीत कोसंबीसारखी मंडळी आपल्या लोककलांचा वारसा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील लोककलांच्या उत्सवात तुम्हीही सहभागी व्हा २ डिसेंबरपासून सोम. आणि मंगळ. रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Read More »

नक्की पाहा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

आयुष्यात जर सुरुवातीलाच एखादी चूक झाली असेल, तर ती चूक आयुष्यभर सोबत घेऊन चालायची का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. सध्याचा काळ बदलला आहे,  आणि त्यामुळे विचार करण्याची पध्दत सुध्दा बदलली आहे. आता लोकं आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर झालेली चूक सुधारुन नव्याने पुढे जाण्याची धमक दाखवतात. अशीच धमक आणि जिद्द गजेंद्र …

Read More »