Home > Marathi News (page 8)

Marathi News

मंगळसूत्राच्या साथीने मंजू आणि शौनक सेलिब्रेट करणार नात्यांची लव्हस्टोरी

शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्याततयार झालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणा-या अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत. घरच्यांचा विरोधात जाऊन आणि देवयानीसोबत असलेले नाते तोडून शौनकने मंजूसोबत लग्नाचा ठोस निर्णय घेऊन तो संपूर्ण जबाबदारीने पूर्ण करुन मंजूशी लग्न केल्यामुळे देवयानीच्या मनातराग आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता आणि विश्वासघात झालेल्याची भावना देवयानीला शांत बसू देणार नाही आणि याचाच बदला घेण्यासाठी देवयानी वेगवेगळ्या मार्गानेशौनक–मंजूच्या संसारात लुडबूड करुन मंजूला मानसिक त्रास देण्याच्या विचारात आहे/प्रयत्नात आहे. सौभाग्यवतींसाठी प्रेमाचे प्रतिक हे मंगळसूत्र असते. मंगळसूत्रामुळे त्यांचे सौंदर्य अजून जास्त खुलून दिसते. पण या दागिन्याचा वापर देवयानी मंजूला त्रास देण्यासाठी कसं करते हे या मालिकेतपाहायला मिळणार आहे. शौनकच्या नावाचं मंगळसूत्र देवयानी घालते आणि नात्याने बायको असलेल्या मंजूला शौनकच्या नावाचं मंगळसूत्र घालायचे आहे पण यात तिचं काही चुकतंय का असा प्रश्नतिच्या मनात उपस्थित झाला आहे. यात मंजूचं काहीही चुकत नसून मंगळसूत्र नवरा-बायकोच्या नात्याचं प्रतिक आहे. प्रेम नसलेल्या नात्यात हे कुरुप दागिन्यासारखं आहे, अशा प्रेमळ शब्दाने तिचीसमजूत काढून शौनक मंजूला मंगळसूत्र भेट म्हणून देतो आणि हा क्षण मंजूसाठी आनंदाचा क्षण ठरतो. या दोघांच्या नात्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांसाठी नेहमी एकत्र येणा-या मंजू आणि शौनकच्या नात्याची लव्हस्टोरीचा एक तासाचा विशेष भाग १६ फेब्रुवारीला नक्की पाहा सोनीमराठीवर.

Read More »

जुळता जुळता जुळतंय की’मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज

  आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांचीलव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अपूर्वाचे स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिला आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडेहॉटेल विकणे हा एकमेव मार्ग जरी असला तरी विजय तिला असे करण्यापासून रोकतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष  ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर कोल्हापूरात येऊन ‘बेस्ट शेफ’ची निवड करणारआहेत’ या जाहिरातीकडे जाते. विष्णु मनोहर अपूर्वाच्या हॉटेलमध्ये येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आणि पदार्थांशी निगडीत कोणत्या टिप्स देणार हे प्रेक्षकांना येत्या सोमवारी एक तासाच्या विशेषभागात पाहायला मिळणार आहे. ख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून पदार्थांची रेसिपी जाणून घ्यायला अनेक स्त्रिया आतूर असतात आणि आता तर घर बसल्या स्त्रियांना आणि प्रेक्षकांना ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतूनविष्णु मनोहर यांच्याकडून रेसिपी जाणून घ्यायला मिळणार आहेत. “अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते पदार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. असे हवेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल”, असे विष्णु मनोहर यांनी म्हटले. अपूर्वाने बनवलेल्या  स्पेशल डिशेस, विष्णु मनोहर यांची  खास रेसिपी आणि अपूर्वा-विजय यांच्या नात्याची लव्हस्टोरी पाहण्यासाठी नक्की बघा ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फक्त सोनी मराठीवर.

Read More »

‘व्हॅलेंटाईन डे’ला आलं पूर्वी भावेचं हॉट, सेन्शुअस, सेक्सी फोटोशूट

  अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून  नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय. रेड सेक्सी सॅटिन वनपिसमध्ये दिसत असलेल्या पूर्वी भावेचा हा मेकओवर खास ‘व्हॅलेटाईन डे’ निमीत्ताने झाला आहे का, असं …

Read More »

मराठी चित्रपट ‘जजमेंट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

judgment

ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वेळी चित्रपट कसा घडला, पडद्यामागील किस्से, गमतीजमती यांचा व्हिडीओसुद्धा लाँच करण्यात आला. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई , माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला …

Read More »

‘ती and ती’च्या ‘घे जगूनी तू’ गाण्यातून दिसणार ‘सिध्दार्थ चांदेकर’ची ही झलक

  प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. पण ‘ती’ त्याला अशा वेळेला भेटते जेव्हा तो त्याच्या हनिमूनवर असतो. तेव्हा उडणारा गोंधळ आणि त्यातून तयार झालेला प्रेमाचा लव्ह ट्रँगल म्हणजे ‘ती and ती’. सई-अनय-प्रियांका या तिघांची गोष्ट असलेला हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा कौटुंबिक मनोरंजन …

Read More »

मी पण सचिन: किंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग 

Me Pan Sachin - Shreyash Jadhav

‘मी पण सचिन‘ या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीतून चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिकांचे आभार मानले आहेत.  किंग जे. डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठी मधील पहिले रॅपर असे बिरुद मिळवलेल्या श्रेयश जाधव यांनी त्यांच्या शैलीत ‘मी पण सचिन’ चित्रपटाचे रॅप सॉंग बनवले आहे. हे …

Read More »

सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स

सई ताम्हणकर

मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे,  ह्या ना त्या कारणाने सई  सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकर सध्या सौशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार …

Read More »

संजय जाधव यांच्या लकी चित्रपटाला महाराष्ट्रभरातून तरूणांचा भरघोस प्रतिसाद

Luckee Poster new

  बी लाइव्ह प्रस्तूत संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून सध्या कॉलेज तरूणांचा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ह्याविषयी सिनेमा एक्जिबिटर्स म्हणतात, “लकी-जियाची लव्हस्टोरी कॉलेज तरूणांना आपलीशी वाटतेय. लकीचे संवाद युवावर्गाला आवडतायत. बाकी लव्हस्टोरीजमधले नायक-नायिका हे कॉलेजमध्ये जाणारे वाटत नाहीत. पण ह्या लव्हस्टोरीचे वैशिष्ठ्य आहे की, लकी …

Read More »

Shimmgga Marathi Movie Teaser – ‘शिमगा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

Shimmgga Marathi Movie

मारूया बोंबा करूया दंगा १५ मार्चला होणार ‘शिमगा’ कोकणातील ‘शिमगा’ हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.  कोकणात होळी हा सण साजरी करण्याच्या …

Read More »

फेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग

ती फुलराणी

मंजू शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूलाघरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे. त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरूआहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू-शौनकच्या पाठी पडली आहेत. “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर”, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या फुलराणीवर ओढवली आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मंजूआपलं शिक्षणाचं स्वप्न कसं काय पूर्ण करणार? यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार? देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळणार आहेत प्रेमाचा महिनासमजला जाणाऱ्या फेब्रुवारीमध्ये… फेब्रुवारीचे ९, १६, २३ या तीनही शनिवारी ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग तुम्ही पाहू शकणार आहात. या प्रेमा  महिन्यात मंजू-शौनकचं प्रेम कितीसंबहरतं आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांना ते कसे पार करतात जाणून घेण्यासाठी पाहत रहा, एक तासाचे हे विशेष भाग, तुमच्या लाडक्या सोनी मराठीवर.

Read More »