Home > Marathi News (page 60)

Marathi News

‘विकता का उत्तर’च्या सेटवर साजरी झाली दिवाळी

मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेम शो आले. मात्र, विकता का उत्तर’ हा त्या सर्वांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. जिंकण्यासाठी भाव करावा लागणं या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या याकार्यक्रमाची दिवाळी देखील अशीच अनोख्या पद्धतीने साजरी झाली. दिवाळीच्या विशेष भागात स्टार प्रवाहाच्या कुटुंबासोबत मोठ्या दिमाखात  दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलसर्वसामान्यांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो असल्यामुळे यंदाची दिवाळी ‘विकता का उत्तर’ च्या सेटवर चांगलीच गाजली. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असलेल्या या सणाच्या मुहूर्तावर रितेश देशमुखनेआपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या आधारे स्पर्धकांना दिवाळीची विशेष भेट देखील दिली. दर शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होत असलेल्या या शोचा हा आठवडा दिवाळी विशेषअसणार आहे. शुक्रवारच्या या दिवाळी विशेष भागात ”विकता का उत्तर’ च्या सेटवर स्टार प्रवाहांच्या ताऱ्यांची झगमगाट पाहायला मिळेल. तर शनिवारी आणि रविवारी रितेश स्पर्धकांसोबत आणि ट्रेडर्ससोबतदिवाळी साजरी करणार आहे. स्टार प्रवाहाच्या या नव्या प्रवाहात ‘आता थांबायचं नाय’ हे ब्रीद अंगी बांधून उतरलेल्या कलाकारांनी देखील या गेम शोमध्ये भाग घेतला होता. सध्या गाजत असलेल्या ‘नकुशी’ आणि ‘गोठ’  मालिकेतील मुख्यकलाकारांनी या गेममध्ये भाग घेत कार्यक्रम रंगात आणला. नव्या दमाच्या आणि अभिनयसंपन्न अशा या नवोदित कलाकारांसोबत रितेशने देखील या दिवाळी भागात चारचाँद लावले. दिवाळीच्या या विशेष भागात’विकता का उत्तर’ च्या सेटवर प्रसिद्ध मराठी अभिनेता उपेंद्र लिमये याचे आगमन प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरणार आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबात उपेंद्र लिमये नेमके काय करत आहेत, हे सध्या गुपित असून, तेनेमके गुपित काय आहे… हे लवकरच कळेल. पण तूर्तास ‘विकता का उत्तर’ च्या सेटवरील दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद लुटुयात.

Read More »

प्रियांका चोप्रा, राजेश मापुसकर आणि आशुतोष गोवारीकर यांचा मराठमोळा नजराणा व्हेंटिलेटर झी स्टुडिओजची रसिकांना दिवाळी भेट

jitendra-joshi-rajesh-mapuskar-and-ashutosh-gowariker-nikhil-sane-at-the-trailer-launch-event-of-marathi-film-ventilator

 कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे. आज कुटुंबे विभक्त झाली असली तरी त्यांच्यातलं प्रेम संपलय असंही नसतं आणि अनेकदा एकत्र आले म्हणजे तिथे केवळ …

Read More »

प्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या ‘फुगे’ सिनेमाचे टीजर पोस्टर लॉंच

fugay-teaser

आपल्या सिनेमातून प्रेमाची नवी परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी लवकरच त्यांच्या आगामी ‘फुगे’ या मराठी सिनेमातून प्रेमाची हटके बॅकस्टोरी लोकांसमोर घेऊन येत आहेत. प्रेमाच्या या हटके बॅकस्टोरीत स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे हे मराठी चित्रपटसृष्टीतले तगडे स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहेत. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन …

Read More »

Motu Patlu Marathi Movie : ‘मोटू पतलू’ चा मराठमोळा अंदाज

Motu Patlu Marathi Cartoon Movie

पाच्छिमात्य एनिमेशन तंत्रज्ञान आणि चित्रपट यांच्या तुलनेत काहीसे एक पाउल मागे असणाऱ्या भारतीय चित्रपट क्षेत्रात उत्तरोत्तर बदल घडून येत आहे. ह्याच अनिमेशन चित्रपटांच्या  क्षेत्रात चार किंवा पाच वर्षे नाही तर तब्बल १६ वर्षे अविरत आणि यशस्वी कार्यरत असणाऱ्या सुहास दत्तात्रय कडव यांच नाव सध्या फारच चर्चेत आहे. जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् मधून केलेचे …

Read More »

गिरीजा ओकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन स्टार प्रवाहवरील ‘गं सहाजणी’ मालिकेत महत्त्वाची भूमिका

  जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री  गिरीजा ओकनं तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजतआहे. ही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानं छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवरील  ‘ग सहाजणी’  या मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी गिरीजा सज्ज आहे. एका बँकेत काम करणाऱ्यासहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका येत्या १० ऑक्टोबर पासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. या मालिकेत गिरीजा ओक ‘विद्या विसपुते’ ही व्यक्तिरेखा साकारतआहे. बँकेची ब्रांच हेड असलेली विद्या विसपुते साधी, सरळ आणि समजूतदार अधिकारी आहे. बँकेतल्या लोकांनी चुका कराव्यात आणि तिने उदार मनाने त्या सांभाळून घ्याव्यात अशी तिची आदर्श व्यक्तिरेखाआहे. या व्यक्तिरेखेसाठी गिरीजाही उत्सुक आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची ‘गं सहाजणी’ ही कलाकृती प्रेक्षकांना निखळ आनंद देणारी, मनोरंजक आहे. गिरीजा ब्रांच हेड असलेल्या या बँकेत शर्वणीपिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोंडवळकर  या अभिनेत्री मुख्य पदांवर आहेत.  रोजच्या जीवनातील दगदग, समस्या आणि नोकरीवर जाणाऱ्या महिलांचं भावविश्वमांडणारी ही मालिका आहे.  या सहाजणी’ मिळून काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे

Read More »

रियान म्हणतोय, माझे बाबा लय भारी

Ritesh Deshmukh

स्टार अभिनेता रितेश देशमुखच्या छोट्या पडद्यावरील आगमनाची इंडस्ट्रीत, प्रेक्षकांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तितकीच उत्सुकता रितेशच्या घरीही आहे. स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या ‘विकता का उत्तर’ या गेम शोमध्ये रितेशला पाहून त्याचा मुलगा रियानही भलताच खुश झाला. बाबांना टीव्हीवर पाहून ‘माझे बाबा लय भारी’ अशीच त्याची प्रतिक्रिया होती. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा-देशमुखनं …

Read More »

व्हेंटीलेटर चित्रपटाचा टीझर लाँच

1440x1440-thumbnail-ventilator (1)

पर्पल पेबल पिक्चर्स यांच्या व्हेंटीलेटर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी एकाच पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार, ही मंडळी कोण असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते, अखेर या गोष्टीवरून पडदा उठलेला आहे. निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अच्युत पोद्दार, …

Read More »

व्हेंटीलेटर चित्रपटाचा टीझर लाँच

1440x1440-thumbnail-ventilator (1)

पर्पल पेबल पिक्चर्स यांच्या व्हेंटीलेटर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी एकाच पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार, ही मंडळी कोण असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते, अखेर या गोष्टीवरून पडदा उठलेला आहे. निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अच्युत पोद्दार, …

Read More »

“डॉ. रखमाबाई” चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच रखमा ते डॉ. रखमाबाई उलगडणार प्रवास

dr-rakhmabai-1st-look-launched

भारताला वैद्यकीय सेवा देणारी पहिली स्त्री वैद्य कोण?… हा प्रश्न एखाद्याला विचारला की फार क्वचित अचूक उत्तराची अपेक्षा असते. वैद्यकीय क्षेत्रात आज कित्येक महिला काम करताना दिसतात. मात्र या सगळ्यांत वैद्यकीय सेवा देणारी “ती” पहिली भारतीय स्त्री वैद्य कोण…? याबाबत मात्र आजही लोक साशंक आहेत. हीच शंका दूर करण्याच्या उद्देशाने …

Read More »

विकता का उत्तर ची उत्सुकता शिगेला स्टार प्रवाहवर ७ ऑक्टोबरपासून सुरुवात

Ritesh Deshmukh

स्टारअभिनेता रितेश देशमुख प्रथमच छोट्या पडद्यावर, भाव करण्याची अनोखी स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांना सेलिब्रेटी बनवणारा गेमशो म्हणून’विकता का उत्तर’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा गेम शो ७ऑक्टोबर पासून शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडे सात वाजता स्टारप्रवाहवर सुरू  होत आहे. मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेमशो  आले. मात्र, ‘विकता का उत्तर’ हा त्या सर्वां …

Read More »