Home > Marathi News (page 39)

Marathi News

‘फिल्मफेअर २०१८’ मध्ये  लॅन्डमार्कच्या ‘रिगण’ने पटकावले पाच पारितोषिक 

Filmfare Award Winning Ringan Team

  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारास पात्र अश्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणाऱ्या विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या शिरपेचात, आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लॅन्डमार्कच्या ‘रिंगण’ या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटीक्स अवाॅर्ड शशांक शेंडे यांना देण्यात आला असून, साहील जोशीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा आणि दिग्दर्शकीय पदार्पणासाठी व …

Read More »

हास्यजत्रेच्या मंचावर सईचं आईला सप्राईज

Sai Tamankar

मुंबई म्हणजे कामात व्यस्त असणारं शहर… या कामाच्या व्याप्यात आपली माणसं बऱ्याचदा दुरावतात. आपल्या सेलिब्रिटीज् च्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच घडते. राहत्या ठिकाणाहून या मायानगरीतयेऊन, आपलं स्थान निर्माण करायचं आणि त्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी धडपड करायची. या सगळ्यात आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती. म्हणजे आपले ‘आई-बाबा’ यांच्यासाठी वेळ काढणं हीकठीण होऊन बसतं. मात्र आपण कितीही बिझी असलो तरी आपल्या आई-बाबांचं आपल्या आयुष्यातलं स्थान साजरं करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी ही पुरेशा असतात, हे सोनी मराठीवर सुरूअसलेल्या हास्यजत्रेची जज् आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पटवून दिलं आहे. हास्य जत्रेच्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकर ने वेळात वेळ काढून आपल्या आईच्या वाढदिवशी तिला बोलावून या मंचावर केक कापला आणि तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्या माऊलीच्याचेहऱ्यावर दिसणारा आनंद वेगळाच होता. सई बरोबरच हास्यजत्रेचे दुसरे जज् प्रसाद ओक, एंकर प्राजक्ता माळी तर समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे – संभेराव, प्रसाद खांडेकर तसेच या शोची संपूर्ण टीम उपस्थिती होती. विणूया अतूट नाती म्हणणाऱ्या सोनी मराठी या नव्या वाहिनीच्या या हास्यजत्रेत नव्याने नाती विणताना जुनी नाती सांभाळणं किती महत्त्वाचं असतं, याचे धडे नकळत मिळत आहेत. या एकंदरवातावरणामुळे संपूर्ण हास्य जत्रा खुलत चालली आहे.

Read More »

आयुष्याच्या नव्याने प्रेमात पाडणारा सचिन पिळगांवकरांचा नवा सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’

LOVE YOU ZINDAGI

  कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात… इथूनच सुरू होतात गंमती-जमती… आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’…! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’ मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं. …

Read More »

BOYZ 2 – लडाखच्या गुलाबी थंडीची अनुभूती देणारे ‘बॉईज २’ चे रोमँटिक गाणं सादर

BOYZ

कॉलेजविश्वात आणि त्याचबरोबर ओघाने येणाऱ्या प्रेमविश्वात नुकतंच पदार्पण झालेल्या, मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या, ‘बॉईज २’ मधील ‘शोना’ हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेमाच्या गुलाबी थंडीची अनुभूती देऊन जाते. सुप्रसिद्ध प्रेमगीतकार मंदार चोळकर लिखित या गाण्याला, रोहित राऊत आणि …

Read More »

सुबोध श्रुतीचे ‘ओ साथी रे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस.

सुबोध श्रुतीचे - ओ साथी रे

सनई-चौघडे,वरात घाई,नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा ‘शुभ लग्न सावधान‘ हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमातील ‘ओ साथी रे’ हे भावनिक गाणं नुकतंच …

Read More »

नाजुका आणि रायबा उधळणार ‘प्रीती सुमने’

प्रीती सुमने - MAAZA AGADBAM

प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा ‘अगडबम’ सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे मन जिंकलं होतं. त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमातील विनोदाचा उच्चांक गाठणारे ‘अटकमटक’ ‘गाणे सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतानाच, आणखीन एक ‘प्रीती सुमनें’ हे लव्ह …

Read More »

‘बॉइज २’ मधून गिरीश कुलकर्णी करणार ‘तोडफोड’

Girish Kulkarni

‘बॉईज’ सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ‘बॉईज २’ मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच ! अवधूत …

Read More »

‘शेंटिमेंटल’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर – प्रिमियरच्या निमित्ताने साजरा होणार अशोक सराफ सप्ताह

SENTIMENTAL

  गेली ४९ वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४९ वर्षांची कामगिरी लक्षात घेता …

Read More »

गणराजाच्या दर्शनाने झाली ‘नशीबवान’ सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात

Ganpati Festival

  कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच आगामी ‘नशीबवान’ सिनेमाच्या टीमने देखील गणेश गल्लीतला ‘मुंबईचा राजा’ आणि ‘लालबागचा राजा’ अश्या दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. ‘नशीबवान’मध्ये मुख्य भूमिका बजावणारा भाऊ कदमदेखील यावेळी हजर होता. …

Read More »

‘शुभ लग्न सावधान’चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

  लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच मंगलमय वातावरणात ट्रेलर लाँच करण्यात आला. दादर येथील …

Read More »