Home > Marathi News (page 20)

Marathi News

एक होती राजकुमारी मधून जयडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला

जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झालाअसून यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारणारी किरण आता डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. लाँच झालेल्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसं आयुष्य जगेल याचं कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात मात्र त्याच्या अगदी विरूध्द या राजकन्येचं खरं आयुष्य आहे. काहीकारणास्तव अवघडलेलं आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपलं आयुष्य जगणारी ही राजकन्या. नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात आपलं स्थान निर्माण करणारी जयडी म्हणजेचअभिनेत्री किरण ढाणे या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवि सौमित्र यांनी साकारली आहे. उत्कृष्ट अभिनेत्यांची ही अदाकारी लवकरच सोनीमराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत विचारले असता, ‘यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. ‘एक होती राजकन्या’च्या निमित्तानं, एका खंबीरमुलीची भूमिका मला साकारायला मिळतेय. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा असल्याचं, तिने स्पष्ट केलं आहे.

Read More »

दिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल, दिप्तीला मिळालं पहिलं मराठी ‘हिरोइन- इंट्रोडक्शन’ साँग

  बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे, हे कधी झाले नाही. पण संजय जाधव हे नेहमी आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामूळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन …

Read More »

स्वतःवरच उलटला मयुरीचा कट

  सेटवर कलाकारांचा नेहमीच कल्ला सुरु असतो. अनेक धमाल किस्से घडत असतात. असाच एक मजेशीर किस्सा ‘प्रेमवारी’च्या सेटवरही घडला. चित्रपटाचा अभिनेता चिन्मय उदगीरकर याला घाबरवण्यासाठी अभिनेत्री मयुरी कापडणे हिने एक कट रचला होता आणि हे खुळ तिच्या डोक्यात भरवले होते अभिजीत चव्हाण यांनी. लाल साडी नेसून, केस मोकळे सोडून, अंगभर …

Read More »

तिरूपतीवरून मागवले ‘भाई’ चित्रपटासाठी केस !

भाई चित्रपट

  येत्या 8 फेब्रुवारीला भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. भाईंचा हा लूक हुबेहूब वठावण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. साळवी ब्रदर्सचे. सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी ह्या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. भाईंचे तरूणपणापासून ते म्हातरपणापर्यंतचे विग्स ‘नॅचरल …

Read More »

तैमूर की सारा अली खान कोण आहे, सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार ?

सारा अली खान आणि तिचा लहान भाऊ तैमूर दोन्ही स्टार किड्स गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियाचा लाडका आहे. तर अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून आपल्या बॉलीवूड डेब्यूमुळे मीडियामध्ये …

Read More »

‘सावट’ चित्रपटाचा चित्तथरारक टिझर प्रदर्शित

Saavat Teaser Poster

  एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात. आणि  ह्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. ह्या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय. कोणाला?.. सावट कथेचा चित्तथरारक टिझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे. त्यातून स्पष्ट होतंय की, हा थरारक सिनेमा पाहताना एक प्रकाराची रक्त गोठवणारी …

Read More »

सई ताम्हणकरच्या पाँडेचरी चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिविल

सई ताम्हणकरच्या - पाँडेचरी चित्रपट

सई ताम्हणकरची फिल्म ‘पाँडेचरी’चे चित्रीकरण 1 फेब्रुवारी पासून पाँडेचरीमध्ये सुरू झाले आहे. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सईचे पोस्टरही रिविल करण्यात आले आहे. ह्या पोस्टरमध्ये सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट नो मेकअप लूक उठून दिसतो आहे. पाँडेचरी सिनेमाविषयी सई ताम्हणकर म्हणते, “ही पहिली फिल्म आहे जी आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप …

Read More »

वन शॉटमध्ये सीन पूर्ण करताना आणि ‘निलांबरी’चं निळू भाऊ करताना होणार हास्य कल्लोळ

  एकीकडे वन शॉटमध्ये सीन शूट करण्याच्या दरम्यान, दिग्दर्शकाकडून कलाकाराला डायलॉग नेमका कसा बोलला गेला पाहिजे  हे सांगताना उडणारी धमाल आणि त्यानंतर कलाकाराचे झालेले कनफ्युझन यामुळे हास्य कल्लोळ माजेल हे नक्की. तर दुसरीकडे मुलाखती दरम्यान, ‘निलांबरी’ या एका साध्या-सोप्या नावातून निळू भाऊ, निल आर्मस्ट्राँग अशी नावं चुकून उच्चारली जाणे म्हणजे आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण …

Read More »

‘डोक्याला शाॅट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित

DOKYALA SHOT - डोक्याला शाॅट

मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट‘ हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात गणेश पंडित, सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. यावरून हा सिनेमा मैत्री, प्रेम, …

Read More »

लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक झाले रिलीज, पहिल्यांदाच एकत्र आले सई,तेजस्विनी, सिध्दार्थ आमि उमेश !

Luckee

  बी लाइव्ह प्रस्तूत, लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव ह्यावेळी उपस्थित होते. पूण्यात झालेल्या ह्या सोहळ्याला पूणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती. …

Read More »