BOYZ 2: ‘बॉईज ’ चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’ चा टीझर

Boyz 2 Posterशाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यास येत आहे. ‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे, या पोस्टरनंतर ‘बॉईज २‘ चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला ‘बॉईज २’  हा सिनेमा महाविद्यालयीन तरुणांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चा हा धाम्माकेदार सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शिवाय ऋषिकेश कोळीच्या संवादलेखनाची बरसात या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.

Boyz 2 Teaser : 

 

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply