प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असतं आणि नात्यांच्या सहवासामुळे अनेक दु:खं सहन करण्याची ताकद मिळते तर सुखी क्षणांचा आनंद साजरा करायला सोबत मिळते. मग ती नाती आपली किंवा परकी असा भेदभाव नसला तरी मायेची, प्रेमाची भावना त्यामध्ये असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा एक नवा कोरा मराठी चित्रपट ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या चित्रपटात मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुहृद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘दाह’ चित्रपटाची कथा ही कौटुंबिक आहे. अतिशय धार्मिक आणि आदर्श वाटाव्यात अशा सौ. साने आणि सुप्रसिध्द डॉक्टर श्री. साने या सुखी जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यांची मुलगी ‘दिशा’च्या येण्याने त्यांच्या संसारात सुख आणि आनंद नांदू लागते. पण हा आनंद किती काळ टिकेल? दिशा ही त्यांची पोटची मुलगी आहे की दत्तक? दत्तक घेतली असेल तर तिचा स्वीकार आनंदाने केला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन वर्षात मिळतील. चित्रपटाच्या कथेसह यामधील गाणी देखील थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतील अशी तयार करण्यात आली आहेत. संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी गाण्यांना संगीत दिले आहे तर प्रत्येक शब्दांतून सुंदर अर्थ मांडणारे गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुध्द वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे. मनाला भिडणा-या ‘दाह’ चित्रपटाची पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे. अभिनेत्री सायली संजीवचा नवा चित्रपट आणि नवीन भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.
Read More »चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी ‘मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डने सन्मानित
आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करून चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणाऱ्या स्वप्नीलचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ या सोहळ्यात ‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू …
Read More »‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
‘पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ या वाक्यामुळे आणि ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या धम्माल गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेल्या बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी …
Read More »‘तुझ्यात जीव रंगला’मधला ‘सनी दा’ अभिनेता राज हंचनाळे अडकला लग्नाच्या बेडीत
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतला राणा दाचा मोठा भाऊ सुरज अर्थात ‘सन्नी दा’ म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे अनेक तरूणींच्या ‘दिल की धडकन’ आहे. ह्या मोस्ट एलिजिबल बॅचलरचे नुकतेच लग्न झाले आहे. राजने त्याची 6 वर्षापासूनची गर्लफ्रेंड मौली देसवालसोबत लग्न केले. सुत्रांच्या अनुसार, मुळची हरयाणाची असलेली मौली आणि मुळच्या कोल्हापुरच्या राजची भेट …
Read More »Raja Rani chi Ga Jodi
Raja Ranichi Ga Jodi TV Serial Star cast – Maniraj Pawar, Shivani Sonar and Shweta Kharat Days and Time – Monday to Saturday 7 PM Channel – Colors Marathi Genre – Romantic and Drama Release Date – 18 Dec 2019 Synopsis: The popular Marathi channel is back with the news …
Read More »‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित
बायोपिक म्हटलं की आपल्या समोर ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील मोठ्या व्यक्ती, नावाजलेले खेळाडू यांच्याच जीवनावर चित्रपट बनवले जातात. मात्र मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही. तर सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जातात. अशाच …
Read More »सायली आणि प्रणवच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’
सायली आणि प्रणवच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ – ‘आटपाडी नाईट्स’ २७ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित ‘आटपाडी नाईट्स’च्या वसंत बापूसाहेब खाटमोडेचा (प्रणव रावराणे) ‘रात्रीचा काहीतरी घोळ’ आहे याची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी वसंता आणि हरिप्रिया (सायली संजीव) यांच्यात जबरदस्त ‘जांगडगुत्ता’ जमून आल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या …
Read More »मकरंद करणार मराठी रंगभूमीवर अभिनयाचा श्रीगणेशा
रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटके लिहणारे मकरंद देशपांडे आता मराठी रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मकरंद देशपांडे मराठी …
Read More »‘आटपाडी नाईट्स’चे नवीन पोस्टर प्रदर्शित
बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाच्या धम्माल टीजर नंतर चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत, नितिन सिंधुविजय सुपेकर लिखित – दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’च्या या नविन पोस्टर मध्ये बंद दाराआडच्या काही गोष्टी उघड झाल्या असून त्यात प्रणव रावराणे आणि सायली संजीव ही जोडी वर – वधुच्या रुपात प्रेक्षकांसमोर …
Read More »जीव धोक्यात घालून किंग जे. डी. चा नवा स्टंट
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या रॅपने थिरकवणारा श्रेयश जाधव उर्फ किंग जे. डी. पुन्हा एकदा जल्लोष करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी किंग जे.डी. आपल्या फॅन्ससाठी घेऊन येत आहे एक नवीन ‘रॅप सॉन्ग’. या गाण्याचे बोल अद्याप पडद्याआड असले, तरी या गाण्यातील एक गुपित समोर आले आहे. या …
Read More »