Author Sandhya Jane’s book ‘Second Spring’ launch by Shaina NC

Author Sandhay Jane and Shaina NC
                                                                    Author Sandhay Jane and Shaina NC

Author Sandhya Jane’s book ‘Second Spring’ was launch today at Title Waves, Bandra by well known strong personality Shaina NC. The book talks about the lead protagonist a smart, successful, thirty-eight-year-old, single mother Avantika and her heartfelt journey through love and life as she falls in love with Rohan, a man six years her junior .

सेकंड स्प्रिंग

 मुंबई : लेखिका संध्या जेन यांच्या सेकंड स्प्रिंग या पुस्तकाचे शायना एनसी यांच्या हस्ते आज वांद्रे येथील ट्वीन व्हेव बुक स्टोअर मध्ये प्रकाशन झाले. मूळ व्यवसायाने बँकर असलेल्या संध्या यांचे भारतात प्रकाशित होणारे हे पहिले पुस्तक आहे. मॅनहॅटन येथे बँकेत काम करत असताना संध्या यांच्या आसपास घडणाऱ्या घटनांचा कथेत अंश आहे. काहीशी सत्य घटनेवर आधारित आणि काहीशी लेखिकेच्या कल्पनेची भरारी पुस्तकात नमूद आहे. प्रेमकथेवर आधारित या पुस्तकातील मूळ व्यक्तिरेखा आजच्या काळातील एक आधुनिक महिला, कामात अग्रेसर सिंगल मदर आहे जी  आपली मुल्य जबाबदाऱ्या ओळखून आहे मात्र जेव्हा ती तिच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या आपल्याच सहकाऱ्याच्या प्रेमात पडते तेव्हा निर्माण झालेला भावनांचा, विचारांचा आणि सभोवताच्या परिस्थितीचा कल्होळ लेखिकेने सेकंड स्प्रिंग या पुस्तकात मांडला आहे. अथांग समुद्राची खोली असलेल्या महिलेच्या मनाचा ठाव घेणारं हे पुस्तक नक्कीच वाचकांना आवडेल अशी प्रतिक्रिया शायना यांनी व्यक्त केली.

About justmarathi

Leave a Reply