Marathi News

जॉन अब्राहम मराठी चित्रपटांच्या प्रेमात 

John Abraham
John Abraham

चित्रपट कथानकाच्या बाबतीत नेहमीच सारासार विचार करणाऱ्या जॉन अब्राहमला मराठी सिनेजगत खुणावत आहे. मराठीत होत असलेले विविध प्रयोग आणि कथानक लक्षात घेता मराठी सिनेसृष्टीची व्याप्ती वाढत आहे, त्यामुळे विद्या बालन, प्रियांका चोप्रा या हिंदीतील हिट अभिनेत्रीनंतर बॉलीवूडचा एंग्री यंग मेन म्हणून ओळख असलेला जॉन अब्राहम मराठीत पाऊल टाकत आहे. मी लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याची अधिकृत घोषणा त्याने ‘फुगे’ या आगामी मराठी सिनेमाच्या ट्रेलर लॉच वेळी केली. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या आगामी ‘फुगे’ या सिनेमाचा ट्रेलर लॉच जॉनच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मराठी सिनेसृष्टीचे कौतुक करताना त्याने म्हटले की, हिन्दी सिनेसृष्टीतून मराठीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सध्या मराठी सिनेमा हा कोणत्याही इतर सिनेमांपेक्षा उत्तम आहे. मला वाटतं की तो आता त्या ठिकाणी पोहोचलेला नाहीए जिकडे भ्रष्ट्राचाराला सुरुवात होते. आपल्याला याच गोष्टीचे संतुलन ठेवले पाहिजे. थोड्या अधिक प्रमाणात प्रत्येक उद्योगात हा प्रकार घडत असतोच, सध्या हिंदी सिनेमांनी मराठी सिनेमांकडून खूप काही शिकले पाहिजे’.

‘फुगे’ या सिनेमाच्या टीमला देखील त्याने भरघोस शुभेच्छा दिल्या. एस टीव्ही नेटवर्कचे इंदर राजकपूर प्रस्तुत, अश्विन अंचन निर्मित आणि माय प्रॉडक्शनच्या अनुराधा जोशी तसेच जीसिम्सचे अर्जुन ब-हान व कार्तिक निशानदार यांची सहनिर्मिती असलेला ‘फुगे’ हा सिनेमा कम्प्लीट इंटरटेंटमेन्टने परिपूर्ण असा आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे यांची केमिस्ट्री सांगणारा हा सिनेमा नक्कीच चांगला व्यवसाय करेल असे जॉनला वाटते. या फिल्मची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी माझी चांगली मैत्रीण असून, तिच्यासोबत मी लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे त्याने सांगितले. ‘मराठीसोबतच मल्याळम सिनेमांकडूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. मराठी सिनेमातले विषय हे खूप वेगळे असतात आणि त्यात नेहमीच प्रयोग होताना दिसतात. हिंदी सिनेमांमध्येही असे प्रयोग झाले पाहिजेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button