Marathi News

स्वप्नांना मिळणार ज्ञानाची जोड ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व’ सोनी मराठीवर

 

नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे. आपल्याबुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, याचंच प्रतिक देणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनास्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व घेऊन येत आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या यशात ह्या कार्यक्रमाच्या  सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा  असतो.ह्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार ? दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार?आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स कोणत्या असणार? असे अनेक प्रश्न  आता सगळ्यांच्या मनात आहेतच.  यासगळ्याच गोष्टी हळूहळू उलगडणारआहेत… लवकरच सोनी मराठीवर येणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ च्या नव्या पर्वात…

Related Articles

Leave a Reply

Back to top button