सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात

 

महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या पंधराव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवाची सुरुवात ६ एप्रिल रोजीहोणार आहे. चित्रपट आणि नाटक अशा प्रमुख दोन विभागात असून नाट्य महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. नाट्य महोत्सवालाप्रेक्षकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात ६ आणि ७ एप्रिल रोजी चित्रपट महोत्सव होणारअसल्याची घोषणा संस्कृती कला दर्पण संस्थेचे आयोजक अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी केली. यंदाच्या वर्षी चित्रपटविभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यांपैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंगा पतंगा,कोती,डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली आहे. चित्रपट विभागातील ज्युरीमंडळात असलेल्या श्रावणी देवधर, दीपक देऊळकर, समृद्धी पोरे, अभिजित पानसे, अमित भंडारी आणि अमृता राव यांनी निवडझालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकार मंडळींसोबत खेळ  पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांनामिळणार असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.  चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातीलसंबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. विशेषम्हणजे, या संपूर्ण महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार आहे.

 

दिनांक   चित्रपटाचे नाव  वेळ 
६ एप्रिल २०१६ नटसम्राट सकाळी १०. ५ वा
६ एप्रिल २०१६ ख्वाडा दुपारी १. ०० वा.
६ एप्रिल २०१६ हलाल दुपारी ३. १५ वा.
६ एप्रिल २०१६ मितवा सं. ५. ३० वा
६ एप्रिल २०१६ देऊळ बंद रात्री ८. ०० वा
७ एप्रिल २०१६ संदूक सकाळी १०. ००
७ एप्रिल २०१६ रंगा पतंगा दुपारी १२. १५ वा.
७ एप्रिल २०१६ कोती दुपारी २.३० वा.
७ एप्रिल २०१६ डबल सीट सं. ५. ०० वा
७ एप्रिल २०१६ दगडी चाळ सं. ७ ०० वा
७ एप्रिल २०१६ कट्यार काळजात घुसली रात्री ९. ३० वा.
Exit mobile version