सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्टसई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

रेणुका शहाणे
रेणुका शहाणे

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने मराठी सिनेमातही काम करावं अशी अनेकांची इच्छा नुकतीच ‘मोगरा फुलला’ या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि या सिनेमानंतर तिचे काम पुन्हा एकदा पाहायला मिळावे असे अनेकांना वाटले. अभिनेत्रीसह दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून पण काम पाहणारी धाडसी, मेहनती, जिद्दी सई जास्त वेळ तिच्या कामापासून लांब राहू शकत नाही हे ही तितकेच खरे आहे. सतत काही ना काही नवीन करत राहायचं, शिकत राहायचं असा विचार करणारी सई आता काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष हमखास असणार यात शंका नाही.

काही दिवसांपूर्वी सई देवधरने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिची आई आणि दिग्दर्शिका श्राबणी देवधरही होत्या. आणि त्या फोटोसह सईने स्पष्ट म्हंटलंय की ‘My second directorial venture’. याचाच अर्थ असा की झी5 वरील ‘डेट’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सईने केले होते आणि आता ती पुन्हा एक नवीन शॉर्ट फिल्म दिग्दर्शित करणार आहे ज्याचे नाव आहे ‘सायलेंट-टाईज’.

पलाश दत्ता यांनी निर्मित केलेल्या ‘सायलेंट-टाईज’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सईने एक नवीन पण तितकाच नाजूक विषय सुंदर पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एलजीबीटी विषयी समाजाला आणि समाजातील लोकांना जागरुक करणे हा या शॉर्ट फिल्मचा हेतू आहे. ही एक कौटुंबिक कथा आहे जी बहिण-भावाच्या नात्यावर आधारित आहे आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यामध्ये बहिणीची भूमिका साकारणार आहे.

या महिन्यात रक्षाबंधन सण ही येतोय आणि सईची नवीन शॉर्ट फिल्म देखील येतेय, त्यामुळे एक छान कलाकृती आणि सोबतीला ब-याच दिवसांनी रेणुका शहाणे यांचा अभिनय पण प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की.

About justmarathi

Check Also

Zoljhal

“झोलझाल” चे जय वीरू

शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …

Leave a Reply