Marathi News

वृक्षप्रेमी सयाजी शिंदे येणार ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर

सयाजी शिंदे
सयाजी शिंदे

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते ज्यांनी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी मनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले असते. आणि येत्या गुरुवारी कर्मवीर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशासोबत पर्यावरणाचे गांभिर्य आणि झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलली आहे. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या मनात झाडांविषयी पहिला विचार कधी आला हे सांगितले आणि ‘झाड’ या विषयावरील अंगावर शहारे आणणारी आणि झाडाचे महत्त्व पटवून देणारी कविता देखील सादर केली.  या मंचावर कर्मवीर सयाजी शिंदे यांच्यासोबत नागराज यांनी केलेल्या खास बातचीतसोबत रंगलेला खेळ पाहायला विसरु नका २७ जूनला रात्री ८:३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button