Marathi News

महिला सशक्तीकरणासाठी अर्थपूर्ण जजमेंट चित्रपट – रामदास आठवले

RAMDAS ATHVLE WITH JUDGMENT TEAMआपल्या समाजामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे काही नवीन नाही. दररोज वर्तमानपत्रात, बातमीपत्रात आपण या संदर्भातल्या अनेक बातम्या वाचतो, पाहतो. याच महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारा ‘जजमेंट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ‘रामदास आठवले’ यांच्यासाठी ‘जजमेंट’ या चित्रपटाच्या स्पेशल शोचे १३ जून रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवले यांनी “हा चित्रपट खऱ्या अर्थाने संपूर्ण स्त्रियांसाठी एक उत्तम पाठ आहे सांगत, आजच्या काळात महिलांवर होणारे अन्याय कमी करण्यासाठी सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. ‘जजमेंट’ सारखे चित्रपट स्त्रियांना नक्कीच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतील तसेच हा चित्रपट महिला सशक्तीकरणासाठी अर्थपूर्ण चित्रपट आहे. असे गौरवोद्गार रामदास आठवले यांनी काढले.
‘जजमेंट’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रल्हाद खंदारे, सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रय आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘जजमेंट’ हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या “ऋण” कादंबरीवर आधारित आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button