Marathi NewsMarathi Trends

‘राजी’व्दारे 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारी पहिली मराठी एक्टरेस ठरली अमृता खानविलकर

अमृता खानविलकर in raazi

 

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राजी चित्रपटाने बॉलीवूडच्या ‘100 करोड क्लब’मध्ये एन्ट्री घेतली आहे. आणि ह्या चित्रपटामूळे 100 करोडक्लब मध्ये पोहोचलेल्या पहिल्या मराठी अभिनेत्रीचा मान अमृता खानविलकरने मिळवला आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने अमृताच्या ह्या यशाचं कौतुक करताना म्हटलंय की, मराठी सिनेसृष्टीत नाव कमवून आपल्या बॉलीवूड करीयरच्या सुरूवातीच्या काळातल्याच एका फिल्मला मिळालेलं हे घवघवीत यश अमृतासाठी नक्कीच महत्वाचे ठरेल. बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत माधुरी दिक्षीत ह्या मराठी आडनावाच्या फक्त एकाच अभिनेत्रीला 100 करोड कल्बचा हा पल्ला गाठता आलाय. पण माधुरी ही बॉलीवूड एक्टरेस म्हणूनच गणली जाते. त्यामूळे अमृता खानविलकर ही 100 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचलेली पहिली मराठी एक्टरेस ठरली आहे.

‘राजी’च्या यशाने आनंदून गेलेली अमृता खानविलकर ह्यावर प्रतिक्रिया देताना म्हणते, “सध्या माझा आनंद गगनात मावत नाही आहे. करण (जोहर) सर, मेघना(गुलजार) मॅम, आलिया विकी आणि युनिटमधल्या प्रत्येकाचीच मेहनत फळाला आलीय, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेल्या ह्या प्रेमासाठी मी त्यांची ऋणी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button