Marathi News

अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या ‘AB आणि CD’चे पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण!

AB आणि CD
AB आणि CD

मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी मराठी सिनेसृष्टी नेहमीच काही ना काही नवी कल्पना, कथा घेऊन येत असते. प्रेक्षक या नात्याने सर्वांना नवीन गोष्टी अनुभवयाला जास्त आवडतात आणि कथेतील नाविन्य त्यांना आवडत असते. गणरायाचे आगमन तर झाले आहे आणि आता सर्वांना आतुरता आहे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या मराठी सिनेमाची झलक पाहण्याची. ‘AB आणि CD’ या सिनेमातून अमिताभ बच्चन मराठीत पदार्पण करत आहेत आणि नुकतेच, या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यामुळे या सिनेमाशी निगडीत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी बरेचजण आतुर आहेत.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित तसेच मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ सिनेमाचे पहिले पोस्टर लालबाग राजाच्या चरणी प्रदर्शित करण्यात आले. यावेळी निर्माते अक्षय बर्दापूरकर, दिग्दर्शक मिलिंद लेले, गोल्डन रेशो चे कुणाल वर्मा, अभिनेत्री सायली संजीव उपस्थित होते. लालबागच्या राजाच्या दर्शनाने ‘AB आणि CD’ सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेचा श्री गणेशा झाला आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची झलक देखील लवकरचं पाहायला मिळेल.

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित आणि गोल्डन रेशो फिल्म्स, केव्हीआर प्रॉडक्शन्स आणि क्रिष्णा प्रसाद प्रस्तुत ‘AB आणि CD’ मध्ये अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांचा याराना सिनेमात दाखवण्यात आला आहे म्हणजेच अमिताभ बच्चन यामध्ये महत्वाची भूमिका साकारणार असून विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. आणि विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये देखील विक्रम गोखले यांनी अमिताभजी यांच्या ‘याराना’ सिनेमातील ‘सारा जमाना हसींनो का दिवाना’ या गाण्यातील गेट अप केला आहे. त्यामुळे सिनेमातील त्यांच्यातील दोस्ती ही नक्कीच विशेष असेल यात शंका नाही.

लवकरच ‘AB आणि CD’ प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button