ह.म. बने तु.म.बने

  • Marathi Newsलता मंगेशकर

    ह.म.बने तु. म.बने कुटुंबात साजरा होणार लता दीदींचा वाढदिवस

    ४० च्या दशकापासून जिचा आवाज संगीतक्षेत्रात घुमतो आहे, अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर २८ सप्टेंबरला ९० वर्षांच्या होत आहेत. लता दीदींच्या याच कारकीर्दीला सलाम करत सोनी मराठीने ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या माध्यमातून लता दीदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या विशेष भागाची बांधणी लता-गीतांनी केली आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला साजेसं गाणं लता दीदींनी आपल्या सुरेल कारकीर्दीत गायलं आहेच. ज्याचा अचूक वापर ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या या स्पेशल भागात पाहायला मिळणार आहे. स्वरसम्राज्ञीच्या गीतांनी बहरलेला हा भाग विशेष ठरणार आहे गीतांमधून होणाऱ्या संवादासाठी. आजपर्यंत कोणतीही मालिका संवादाशिवाय प्रक्षेपित केली गेली नव्हती. मात्र सोनी मराठीवर लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त सादर होणाऱ्या भागात एक नवा प्रयोग करताना आपल्याला दिसणार आहे. कोणताही संवाद नसलेल्या या भागात ह.म.बने तु.म.बने कुटुंबीय लता दीदींच्या गाण्यातून संवाद साधताना दिसणार आहेत. बने आज्जी – अप्पांपासून ते पार्थ – रेहापर्यंत सगळ्यांच्या वयाला आणि भावनांना व्यक्त करतील अशी गाणी लता दीदींनी गायली आहेत. यापैकी नेमकी कोणती गाणी बने कुटुंबाच्या भावना व्यक्त करण्यास सहाय्यक ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहेत. तेव्हा ह.म.बने तु. म.बने अनोख्या पध्दतीत साजरा होणारा लता दीदींचा वाढदिवस नक्की पहा, २८ सप्टेंबरला रात्री १० वाजता फक्त सोनी मराठीवर.

    Read More »
  • Marathi Newsह.म.बने तु.म.बने परिवार

    ह.म.बने तु.म.बने परिवार निघालयं वारीला बने परिवारही लुटणार वारीची मजा

    अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या…

    Read More »
  • Marathi Newsह.म.बने तु.म.बने

    ‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ

    आपल्या घरी कोणी आजारी पडलं की सर्व घराची एकच धांदल उडते. सर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत गढून जातात. त्यातच पेशंट…

    Read More »
  • Marathi NewsH. M. Bane T. M. Bane Marathi Serial

    ‘ह.म. बने तु.म. बने’ ची हाक, “मतदारा जागा हो”

    सोनी मराठीवरील ‘ह.म. बने तु.म. बने’ ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत…

    Read More »
  • Marathi NewsHum bane Tum Bane

    Hum bane Tum Bane : वडील-मुलीच्या नाते अजून घट्ट विणण्यासाठी सोनी मराठीने घेतला खास पुढाकार

      वडील आणि मुलगी यांच्यामधील नातं हे खूप अनोखं असतं. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात आणि एक आदर्श…

    Read More »
Back to top button