Home > Tag Archives: ती फुलराणी

Tag Archives: ती फुलराणी

फेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग

ती फुलराणी

मंजू शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूलाघरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे. त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरूआहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू-शौनकच्या पाठी पडली आहेत. “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर”, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या फुलराणीवर ओढवली आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मंजूआपलं शिक्षणाचं स्वप्न कसं काय पूर्ण करणार? यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार? देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळणार आहेत प्रेमाचा महिनासमजला जाणाऱ्या फेब्रुवारीमध्ये… फेब्रुवारीचे ९, १६, २३ या तीनही शनिवारी ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग तुम्ही पाहू शकणार आहात. या प्रेमा  महिन्यात मंजू-शौनकचं प्रेम कितीसंबहरतं आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांना ते कसे पार करतात जाणून घेण्यासाठी पाहत रहा, एक तासाचे हे विशेष भाग, तुमच्या लाडक्या सोनी मराठीवर.

Read More »

Ti Fulrani Marathi Serial : मंजूने उचलला आहे शिकायचा विडा – उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’

Ti Fulrani Marathi Serial

शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण…ही आहे ‘ती फुलराणी’तल्या मंजूची गोष्ट. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, “नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!”, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला… त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? जाणून घेण्यासाठी पहात रहा ‘ती फुलराणी’ फक्त सोनी मराठीवर…

Read More »