Sunday , December 16 2018
Home > Marathi News (page 30)

Marathi News

विकता का उत्तर?’ चा सेट ठरतोय सामान्यांना व्यक्त होऊ देणारे हक्काचे व्यासपीठ

मराठी माणसाच्या बुद्धीमत्तेबरोबरच त्याचे व्यवहारकौशल्यदेखील हेरणा-या ‘विकता का उत्तर’ या कार्यक्रमाचा यंदाचा आठवडा,महाराष्ट्राच्या तमाम रसिकप्रेक्षकांना मोठी पर्वणी ठरणार आहे. मराठी माणसांचे भावविश्व, त्याच्या आशा-आकांक्षा टिपणारा हा कार्यक्रम केवळ खेळ म्हणून मर्यादित n राहता सामान्यांना व्यक्त होऊ देणारे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. कधी हसून तर कधी रडून प्रेक्षकांना आपलेस करण्यात यशस्वी झालेल्या ‘विकता का उत्तर’ च्या यंदाच्या भागात …

Read More »

‘एड्स’ विषयी नि:संकोचपणे बोलले पाहिजे

suvrat-joshi

कलाकारांनी व्यक्त केले आपले मत आज जागतिक एड्स जनजागृती दिन विशेष  आज १ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स जनजागृती दिन म्हणून जगभरात पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. या विषयावर निःसंकोचपणे बोलले जात नाही. याठीच मराठी नाट्य, चित्रपट …

Read More »

‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री ५ डिसेंबरला विशेष भाग

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे.संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे.  .

Read More »

मनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार ‘विकता का उत्तर?

vku-ep-19-3

स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग गेम शो ‘विकता का उत्तर’ ला ‘महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. ‘विकताका उत्तर?’ च्या या यंदाच्या भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तकप्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्तआयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणाया दीपिका दुसाने  यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचेप्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल्यादिलखुलास संवाद शैलीने त्यांनी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे.  डान्स, मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले  तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीचपसंत करतील, यात शंका नाही.

Read More »

नाट्यगृहांत सुविधांचा अभाव

fugay

रंगकर्मींमध्ये नाराजी कुठे उंदरांचा सुळसुळाट, तर कुठे दरवाजांना कड्या नाहीत, कुठे स्वच्छतागृहच अस्वच्छ काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमित राघवन यांनी फेसबुक या सोशल साईटवर एक व्हिडियो शेअर केला आणि अवघ्या नाट्य व कला सृष्टीत चर्चेचा विषय ठरलाय. त्याचे झाले असे कि काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त सुमित आणि चिन्मयी राघवन हे दोघे …

Read More »

प्रेक्षकांसाठी ‘फुगे’ सिनेमाचे प्रदर्शन लांबवले

fugay-teaser

देशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अवलंबिलेल्या ५००आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला चहूबाजूंनी संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. भारतातील आर्थिक उलाढालीसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या या निर्णयाचा पडसाद समाजातील प्रत्येक क्षेत्रावर पडलेला दिसून येत आहे. याला मनोरंजन क्षेत्रदेखील अपवाद नाही. केंद्रसरकारच्या या धाडसी धोरणाला सकरात्मक प्रतिसाद देण्यासाठी तसेच रसिक प्रेक्षकांची गैरसोय …

Read More »

आर्थिक परीक्षेच्या काळातही ‘व्हेंटिलेटरला’ प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद अकरा दिवसात केली अकरा कोटींची कमाई

1440x1440-thumbnail-ventilator (1)

केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली शिवाय बॅंकेमधून पैसे काढण्यावरही मर्यादा आली ज्याचा परिणाम विविध व्यापारावर आणि व्यवसायावर झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत सर्वत्रच आर्थिक अडचणींचा आणि काटकसरीचा हा काळ सुरु झाला असला तरी अशाही परिस्थितीत ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या …

Read More »

मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत दिसणार नोटाबंदीचे पडसाद

भारतातून काळ्या पाश्याचा नायनाट करण्यासाठी केंद्रसरकारने उचललेल्या चलनबदलांच्या निर्णयावर संपूर्ण देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ५०० आणि १००० रु.च्या नोटाबंदीचे पडसाद देशातील सर्व क्षेत्रामध्ये पडले आहे. त्यामुळे पर्यायी नोटा उपलब्ध करून त्याचे समान वाटप करण्याची मोठी जबाबदारी आज भारतातील प्रत्येक बँकेवर आली आहे. दैनंदिन खर्चासाठी अत्यंत आवश्यक असलेले पैसे बदलून …

Read More »

फुगे चित्रपट दुसरे सॉंग कालच Youtube पार्टी दे

fugay-teaser

Song – Party De Singer – Amitraj Music – Amitraj Lyricist – Kshitij Patwardhan Cast – Swwapnil Joshi, Subodh Bhave, Prarthana Behere & Neeta Shetty Production House – Stv Networks & GSEAMS-MAAY Producer – Ashwin Anchan, Anuradha Joshi, Arjun Singgh Baran & Kartik Nishandar Director – Swapna Waghmare Joshi

Read More »

आम्ही दोघे राजाराणी’ सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन

adrr-images-6

दोन विविध याक्तीरेखाची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सॉलिड फ्रिक्शन तयार होते, या दोघांची लव्हस्टोरी देखील धम्माल असते. स्टार प्रवाहवर ‘आम्ही दोघे राजा राणी‘ या मालिकेतून अशीच एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  पार्थ आणि मधुरा हे दोन राजा राणी या मालिकेत असून ही दोघेही आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात …

Read More »