Marathi NewsNews

रेमाच्या सरीत चिंब भिजवणारा पाऊस- ‘ओली ती माती’

 रेमाच्या सरीत चिंब भिजवणारा पाऊस- 'ओली ती माती'

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस… जीवनात चैतन्य आणण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. प्रेमाचा रंग आणि मायेचा ओलावा या दोहोंसाठी पाऊस आणि प्रेम एकमेकांसाठी पूरक आहेत. म्हणूनच तर पाऊस आणि प्रेम हे सूत्र आयुष्यात प्रत्येकाला लागू होते. अशा या पाऊस आणि प्रेमाचे नाते सांगणारा ‘ओली ती माती’ हे गाणे प्रत्येकांच्या ओठी ऐकायला मिळत आहे. व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या आगामी चित्रपटातील हे गाणे रसिकांना आपल्या संगीतमय सुरात ओलेचिंब करणारा आहे. नेहा राजपाल यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला केतकी माटेगावकरचा सुरेल आवाज लाभला आहे. विशेष म्हणजे गायिका नेहा राजपाल यांनी प्रथमच या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने गायिका, निर्माती सोबतच नेहाने कवयित्री बनण्याची देखील हाऊस भागवून घेतली. हे गाणे अभिनेत्री पर्ण पेठेवर चित्रित केले असून, पाउसाच्या नाजूक सरीचे सुंदर चित्रण यात पाहायला मिळते. .

कॉलेज तरुणांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमातील गाणी तरुण मनाला फुलवणारे आहेत. कॉलेज तरुणाईचे भावविश्व टिपणारा ‘फोटोकॉपी’ या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. या सिनेमात पर्ण दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार असून, चेतन चिटणीस नावाचा गोंडस चेहरा यांमार्फत लोकांसमोर सादर होत आहे. या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button