Marathi News

मी पण सचिन: किंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग 

Me Pan Sachin - Shreyash Jadhav
मी पण सचिन‘ या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीतून चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिकांचे आभार मानले आहेत.  किंग जे. डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठी मधील पहिले रॅपर असे बिरुद मिळवलेल्या श्रेयश जाधव यांनी त्यांच्या शैलीत ‘मी पण सचिन’ चित्रपटाचे रॅप सॉंग बनवले आहे. हे जरी रॅप सॉंग असले तरी ते एक प्रेरणादायी गाणे सुद्धा आहे. स्वप्नांच्या दिशेने प्रवास करताना, त्या प्रवासाला पाठिंबा देताना आवश्यक अशा स्फूर्तीदायी शब्दांनी परिपूर्ण असे हे रॅप सॉंग आहे. लोकांनी कितीही मागे खेचले तरी आपल्या स्वप्नांच्या दिशेने केला जाणारा खडतर प्रवास हा नक्कीच यश मिळवून देतो. असा मतीतार्थ या रॅप सॉंग मधून मिळत आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी जे लोक मेहनत करत आहेत, अशा लोकांना हे गाणं नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
८ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘मी पण सचिन’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. त्याबद्दल एक कृतज्ञता आणि आपल्या फॅन्स साठी पण भेट म्हणून श्रेयश जाधव उर्फ किंग जे.डी. यांनी हे रॅप सॉंग तयार केले आहे. ‘मी पण सचिन’ या चित्रपटात स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, मृणाल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावर वितरण देखील केले गेले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button