Home > Marathi News > फॅशनिस्टा सई ताम्हणकरच्या लंडनमधल्या ह्या पाच लुक्सच्या तुम्ही प्रेमात पडाल

फॅशनिस्टा सई ताम्हणकरच्या लंडनमधल्या ह्या पाच लुक्सच्या तुम्ही प्रेमात पडाल

सई ताम्हणकरच्या

 

सई ताम्हणकर नुकतीच आपल्या लव्ह सोनिया सिनेमाच्या प्रिमीयरसाठी लंडनला गेली होती. मृणाल ठाकुर, रिचा चड्ढा, राजकुमार राव, फ्रिडा पिंटो आणि  डेमी मोअर स्टारर ह्या सिनेमात सई महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ह्या सिनेमाच्या लंडन स्क्रिनींगसाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या सईच्या पाच स्टनिंग लुक्सच्या तर आपण प्रेमातच पडतो. आणि अशा लुक्समध्ये आपणही दिसण्याची इच्छा प्रत्येक मुलीला होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सईच्या स्ट्रीटवेअर लूक ते रेडकार्पेट लूकविषयी जाणून घ्या .

 

  1. बॉस-बेब लूक : सईने रेड कार्पेटसाठी युजवल रेड-कार्पेट गाऊन चुज न करता ‘झारा’ (Zara)चा सूट घालणं प्रिफर केलं. त्यावर तिन घातलेल्या डायमंड चोकरने तिचा एलिगंट लुक अजूनच उठून दिसत होता.
  2. क्लासी लूक : पिंक पॅंट्सला मॅच होणारे तिचे पिंक चिक्स… आणि त्यावर तिने घातलेला व्हाइट टॉप.. तिच्याकडे लक्ष वेधून घ्यायला पूरेसा होता… असा फंकी टॉप तुम्हाला हवाहवासा वाटणं.. तर सहाजिकच आहे.
  3. इजी-ब्रिझी लूक :झारा(Zara)च्या ब्लॅक स्टनिंग वनपिसवर ब्लू लाँग श्रग आटफिटला इजी-ब्रिझी लूक देतो.. सईने घातलेल्या ह्या कॉज्युअल लूकमूळे ती सिंपल पण त्याचवेळी स्टनिंगसूध्दा दिसतेय. लंच, डिनर किंवा कोणत्याही छोट्या आउटिंगला असा ड्रेस घालू शकता..
  4. ऑल चिक लूक : ब्लॅक सईचा फेवरेट कलर आहे, आणि हा कलर पार्टीवेअर किंवा रेडकार्पेट लूकसाठीही वापरला जातो. ब्लॅक वन-पिसवर सईने टॉप शॉपच्या लाँग इअररिंग घातल्या आहेत.
  5. स्ट्रीट स्टाइल : परफेक्ट डेनिम आणि त्यावर कम्फर्टेबल टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज आणि एखादं जॅकेट.. भटकंतीसाठी उत्तम आउटफिट आहे, असं सई मानते.. त्यामूळे लंडन स्ट्रीटवर ती ह्या लूकमध्ये सिंपल पण स्टाइलिश वाटतेय.

About justmarathi

Check Also

Ek Hoti Rajkanya

Sony Marathi “Ek Hoti Rajkanya” Social Media Comments

  किरणच्या चाहत्यांना आवडतेय किरणने साकारलेली विदर्भातील अवनी अभिनेत्री किरण ढाणे हिने छोट्या पडद्यावर उत्तम …

Leave a Reply