Saturday , February 23 2019
Home > Marathi News > प्रीती झांगियानी, परवीन दबास, मुकेश ऋषी, परवेझ दमानिया यांनी केले आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ चे उदघाटन !

प्रीती झांगियानी, परवीन दबास, मुकेश ऋषी, परवेझ दमानिया यांनी केले आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ चे उदघाटन !

भारताच्या वेगवेगळ्या भागांतील सुमारे 200 कलाकारांच्या 3000 कलाकृतींच्या ‘आर्टिव्हल २०१८’ या कला प्रदर्शनाचे अनावरण अभिनेता मुकेश ऋषि, परवीन दबास आणि पुष्कर लॉज या आगामी चित्रपटाची अभिनेत्री प्रीती झांगियानी, दिग्दर्शक विजय सुतार, निर्माते इंदर सुतार, एचआर गुरू सुजीत पाटकर, मांजू लोढा आणि परवेझ दमानिया यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ मध्ये भारताच्या विविध भागातील भाग घेणाऱ्या कलाकारांमध्ये टी. वैकुंठम, बी प्रभा, जमिनी रॉय, सुहास रॉय, गणेश पायने, रमेश गोरजाला, अजय डे आणि सीमा कोहली अशा अनेक कलाकारांचा प्रामुख्याने समावेश आहे.सतीश बी पाटील, शरद गुरव आणि सायप्रसंद जान यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, कला संग्राहक, संभाव्य खरेदीदार आणि कला संरक्षकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देणारा आहे.
‘आर्टिव्हल २०१८’,  २३ नोव्हेंबर – २५ नोव्हेंबर २०१८ रोजी दररोज सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेडमध्ये एक्सपो सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे.

Check Also

मुंबईत रॉम-कॉम ‘ती अँड ती’ टीमच्या उपस्थितीत पत्रकार परिषद धमाल पध्दतीने रंगली

  प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून नवीन विषय, नवीन जोडी पाहायला मिळाल्यावर ‘आपले मनोरंजन नक्की होणार याची खात्री पटते. आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनरअसलेला मराठी सिनेमा ‘ती अँड ती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमात प्रेक्षकांना नवीन विषयासह कलाकारांची युनिक निवड, सोबतीला मजेशीरडायलॉग्स, सुंदर गाणी आणि लंडनमध्ये पूर्ण सिनेमा शूट झाल्यामुळे तेथील लोकेशन अनुभवयाला आणि पाहायला मिळणार आहेत. ही कहाणी आहे  ‘अनय ‘ ची  जो एक स्वप्नाळू मुलगा आहे. चौथीत असताना शाळेतल्या एका मुलीवर त्याचा जीव जडतो आणि “ती” शाळा सोडून गेल्यावरही तो “तिला” कधीच विसरू शकत नाही.रोमान्सच्या त्याच्या कल्पना मनातच राहतात. पण एके दिवशी जणू देव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याची “ती” त्याला भेटते… प्रॉब्लेम एवढाच असतो की तेव्हा तो त्याच्या बायको बरोबर हनिमूनलागेलेला असतो. इंग्लंडच्या निसर्ग सुंदर लोकेशन्सवर चित्रित झालेल्या “ती आणि ती” च्या कथानकात जेवढी गंमत आहे तीच धमाल आपल्याला या “रॉम-कॉम” मध्ये बघायला मिळणार आहे. निर्माता आणि प्रमुखभूमिका अशा दोन्ही जबाबदाऱ्या पुष्कर जोगनी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. चित्रपटातल्या “ती” आणि “ती” च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांनी सुरेख रंग भरले आहेत.  सिद्धार्थ चांदेकर ही एका विशेष भूमिकेत आपल्याला या चित्रपटात भेटेल. या सिनेमाच्या निमित्ताने मुंबईतील पत्रकारांसोबत मनमोकळा संवाद साधण्यासाठी ‘ती अँड ती’ सिनेमाच्या टीमची मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतदिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, कलाकार पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, सिध्दार्थ चांदेकर, निर्माते वैशाल शाह, मोहन नादर, लेखक विराजस कुलकर्णी उपस्थित होते. तसेच, त्यांच्यासोबतीला संगीतकार साई-पियुष, गायक अवधूत गुप्ते आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांची देखील उपस्थिती होती. प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणारी अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसते. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हेइंग्लंड मध्ये झालेले आहे आणि गंमत म्हणजे या चित्रपटाची कथा पटकथा विराजस कुलकर्णी ह्यांनी लिहिलेली आहे. संवादलेखक आहेत मर्मबंधा आणि विराजस कुलकर्णी . चित्रपटाला संगीत नव्या दमाच्या साई-पियुष ह्यांनी दिले आहे आणि चित्रपटातील धमाल गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते, महालक्ष्मी अय्यर, रोहित राउत, जुईली जोगळेकर, गौरव बुरसे आणि अर्पिताचक्रवर्ती यांनी दिला आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे हर्षवर्धन पाटील ह्यांनी तर संकलन आहे अर्जुन मोगरे ह्यांचे, ध्वनी लेखक आहेत स्वराधीश स्टुडियोचे स्वरूप जोशी तर प्रमुखसहायक दिग्दर्शक आहेत जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. वैषल शाह, पुष्कर जोग आणि मोहन नदार ह्यांची निर्मितीअसलेला “ती & ती ” ८ मार्च २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Vicky Kaushal Score Trends Ranking

‘उरी’ सिनेमाच्यामूळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर लोकप्रियतेत विकी कौशल ठरला अग्रेसर !!!

  विकी कौशलच्या ‘हाउज दि जोश’ ह्या डायलॉगमूळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंग मध्येही वाढता जोश …

Leave a Reply