Friday , December 14 2018
Home > Marathi News > कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीजर लाँच

कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीजर लाँच

 

तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणा-या अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’ या आगामी मराठी चित्रपटाचाटीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ‘लव्ह यु जिंदगी’ च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटकेविषयावर       भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे.

       प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच

कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

        तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारचवेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगूशकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारीकथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल हे नक्की.

      दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठीगरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस.

     एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिलीआहे.

कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Check Also

Majhya baikocha priyakar

Majhya baikocha priyakar first day box office

  For the M Town audience, there was only one movie to release, which came …

नवीन वर्षात सर्वजण म्हणणार ‘लव्ह यु जिंदगी’

  प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण ‘लव्ह यु जिंदगी’ यामराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहिले आहे. टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला होता. पण प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि इंटरेस्टिंगकरण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिकासाकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्येत्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर कविता लाडआणि प्रार्थना बेहरे देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. कविता लाड यांनी प्रत्येक मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या प्रत्येक भूमिकेला मनापासून प्रतिसाददिला आहे. पण  नवीन वर्षात ‘लव्ह यु जिंदगी’मुळे कविता लाड यांची नवी भूमिका आणि तिघांचीही पहिल्यांदाच जुळून आलेली ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजकठरणार आहे. एस. पी. प्रोडक्शन्स  प्रस्तुत, सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या कौटुंबिक मनोरंजन करणा-या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केले असून हा चित्रपट ११जानेवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply